एमपीडीए कायद्यानुसार गोंदिया पोलीसांनी एका गुंड प्रवृत्तीच्या इसमावर केली स्थानबद्ध धडक कारवाई…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, गोंदिया मा.श्री.चिन्मय गोतमारे, यांचे आदेशान्वये, मा. पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया शहरातील धोकादायक गुंड प्रवृतीचा इसम ‘एमपीडीए’ खाली एक वर्षाकरीता स्थानबद्ध. गोंदिया जिल्हयाच्या इतिहासातील पहिलीच कारवाई करण्यात आली असून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
➡️ सार्वजनिक शांततेस धोका असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मा. श्री. चिन्मय गोतमारे, यांनी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
⏩ वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन गोंदिया शहर पोलीसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यांतर्गंत गोंदिया जिल्ह्यातील सराईत धोकादायक गुन्हेगार नामे शंकर ऊर्फ गुरु राजाराम पटले, वय 25 वर्ष, राहणार जोगळेकर वार्ड, संजयनगर गोंदिया, ता. जिल्हा गोंदिया याच्या विरुद्ध एमपीडीए कायादयाअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामधील ही पहिलीच कारवाई आहे.

⏩ एमपीडीए कायादया अंतर्गत कारवाईचा शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.
⏩ पोलीस ठाणे गोंदिया शहर हद्दीतील धोकादायक गुंड – शंकर ऊर्फ गुरु राजाराम पटले, वय 25 वर्ष, राहणार जोगळेकर वार्ड, संजयनगर गोंदिया,ता. जिल्हा गोंदिया याला ‘एमपीडीए’ कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करुन त्याची रवानगी जिल्हा कारागृहात भंडारा येथे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एमपीडीए नुसार करण्यात आलेली कारवाई ही पहिलीच कारवाई आहे.
⏩ सदर गुन्हेगारांवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यामध्ये खून, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, चाकूने गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करुन मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ करणे, अश्या विविध प्रकारचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
⏩ स्थानबध्द इसमाकडून सार्वजनिक शांततेस धोका असल्याने पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे यांचे निर्देशांन्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया, श्री. सुनील ताजने, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, श्री. प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. चद्रकांत सुर्य़वंशी पो.ठाणे गोंदिया शहर,स.पो.नि सागर पाटील, पो.हवा.जागेश्वर उईके, कवलपालसिंह भाटिया, सुदेश टेंभरे, प्रमोद चव्हाण, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे पोशि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, करण बारेवार, सुभाष सोनवणे, अशोक रहांगडाले यांनी नमूद आरोपीविरुद्ध कारवाई करून एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करीता प्रस्ताव मा.पोलीस अधीक्षक, कार्यालय गोंदिया येथे सादर करण्यात आले होते.
🎯 या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. दिनेश लबडे, स्थागुशा गोंदिया, यांचे मार्गदर्शनात पोलीस उप. निरीक्षक श्रीमती- वनिता सायकर, पो.हवा. चेतन पटले, प्रतिबंधक सेल स्थागुशा गोंदिया यांनी प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, कार्यालय गोंदिया यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्याकडे मंजुरी करिता पाठविण्यात आला होता. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, गोंदिया मा. श्री. चिन्मय गोतमारे, यांनी नमूद धोकादायक इसमाविरूद्ध दिनांक- 07/09/2023 रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
काय आहे एमपीडीए कायदा? 👇
👉. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 म्हणजेच एमपीडीए कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी ) होय. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती विरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com