आळेफाटा पोलीसांनी पुणे व अहमदनगर जिल्ह्यातुन कार, मोटारसायकल व टायर चोरणारी अट्टल चोरट्यांची टोळी केली जेरबंद एकुण ३१,२०,००० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे ग्रामीण ; आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दिनांक ०७/१०/२०२४ रोजी फिर्यादी नामे श्रीकांत भाऊसाहेब भुजबळ वय ३७ वर्षे व्यवसाय खाजगी नोकरी रा. आळे, बोरी रोड, बाभळबन ता. जुन्नर जि. पुणे यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०६/१०/२०२४ रोजी रात्री १०/३० ते दिनांक ०७/१०/२०२४ रोजी सकाळी ०६/०० वा. चे दरम्यान माझे मालकीची मारूती सुझुकी कंपनीची इको कार कमांक एक. एच.१२ एम.आर. ६८४३ एम.जी. ग्रे रंगाची तिचा इंजिन नंबर G12BN427500 तिचा चॅसी नं. MA3ERLF1S00450747 असा हि कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे म्हणुन माझी अज्ञात चोरट्याविरूध्द कायदेशिर फिर्याद आहे, वगैरे मजकुरचे फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांचे विरूदध गु.र.नं.२९७/२४ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, पोलीस कॉन्स्टेबल अमित मालुंजे असे रवाना होवुन तपास करीत असतांना यातील आरोपी नामे १) शुभम भाऊसाहेब घुले वय २१ वर्षे रा. जांबुत बु. ता. संगमनेर जि. अहमदनगर सध्या रा. भांबुर्डी सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर २) आदीत्य सुदाम केदारी वय १९ वर्षे रा. पळशी वनकुटे ता. पारनेर जि. अहमदनगर सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर हे गुन्हयात चोरीस गेलेली मारूती सुझुकी इको कार चालवित घेवुन जात असतांना मिळुन आले असुन त्यांना थांबवुन त्यांचेकडे इको कारबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने त्यांना सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कार चोरी तसेच मोटारसायकल चोरी, टायर बोरीचे पुणे व अहमदनगर जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यांनी सदरचे गुन्हे हे ३) रोशन गोरक्षनाथ भवर वय २० वर्षे सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर मुळ रा. समनापुर ता. संगमनेर जि. अहमदनगर ४) कृष्णा सोमनाथ शेजुळ सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर मुळ रा. पिचडगांव ता. नेवासा जि. अहमदनगर, ५) आकाश शेंगाळ पुर्ण नाव माहीत नाही सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर मुळ रा. हिवरगाव पठार ता. संगमनेर जि. अहमदनगर यांचेबरोबर मिळून केलेले असुन यातील रोशन गोरक्षनाथ भवर वय २० वर्षे सध्या रा. वाखुर्डे खुर्द सुपा ता. पारनेर जि. अहमदनगर मुळ रा. समनापुर ता. संगमनेर जि. अहमदनगर यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेली आहे. तसेच टायर चोरीमध्ये ६) सुनिल सुरेश मधे उर्फ सुनिल रामदास भूतांब्रे वय.१९ वर्षे रा. खांबा वरवडी ता. संगमनेर जि. अहमदनगर हा सामील असल्याने त्याला सुध्दा टायर चोरीचे गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. नमुद अटक आरोपी यांनी कार चोरी, टायर बोरी, मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली असुन त्यांच्याकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.असे एकुण २० गुन्हे उघडकीस आलेले असुन अटक आरोपी यांचेकडुन १ इको कार,१ बोलेरो जिप, १७ मोटारसायकल व ४३ टायर असा एकुण अंदाजे ३१,२०,०००/- (एकतीस लाख वीस हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्याचे कामी ताब्यात घेण्यात आलेला असुन पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी ही मा.श्री पंकज देशमुख साो पोलीस अधीक्षक पुणे ग्ामीण, मा.रमेश चोपडे साो अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग, मा.रविंद्र चौधर साो उपविभागीय पोलीस अधिकारी साो जुन्नर विभाग, मा. अविनाश शिळीमकर सखो. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दिनेश तायडे साो, यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, भिमा लोंढे, पंकज पारखे, अमित पोळ, संतोष दुपारगुडे, पुरूषोत्तम थोरात, संदीप माळवदे, राजेंद्र हिले, सुनिल गिरी, पोलीस कॉन्स्टेबल अमित माळुंजे, नवीन अरगडे, शैलेश वाघमारे, विष्णु दहीफळे, गणेश जगताप, ऑकार खुणे, सचिन कोबल, गणेश सपकाळ, निखील मोरमारे, संतोष साळुंके, भुजंग सुकाळे, किरण शेळके यांनी केली आहे.